कोबी वर्गीय पिके
कोबीवर्गीय पिकांची लागवड रब्बी व उन्हाळी हंगामात सपाट वाफा पद्धतीने करावी. फ्लॉवर व ब्रोकोलीच्या रोपांची पुनर्लागवड ६० सें.मी. x ४५ सें.मी., कोबीची लागवड ४५ सें.मी. x ३० सें.मी. अंतरावर; तर नवलकोल रोपांची पुनर्लागवड ३० सें.मी. x २० सें.मी. अंतरावर करावी. प्रत्येक ठिकाणी एकच रोप लावावे. रोप लावताना शेंडा खुडला जाऊ नये किंवा शेंड्याला कोणत्याही प्रकारे
कोबी वर्गीय पिकात सापळा पिकांचे महत्त्व
इजा झालेली नसावी. चांगल्या जोमदार रोपाची लागवड करावी, म्हणजे चांगला गड्डा पोसला जाईल व भरपूर उत्पादन मिळेल. रोपांची पुनर्लागवड संध्याकाळच्या वेळी करावी. लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे. पुनर्लागवडीपूर्वी रोपांची मुळे कार्बेंडाझिम २ ग्रॅम अधिक कार्बोसल्फान २ मि.लि. प्रति लिटर पाणी या द्रावणात बुडवून घ्यावीत.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.