आमच्याबद्दल


!!कृषिक शेतकरी आधुनिक शेतकरी!!

हवामान व हवामानाची निश्चितता देशाच्या अन्न सुरक्षेसाठी धोकादायक आहे. प्रत्येक वर्षी अतिवृष्ठीगारांचा पाऊस, दुष्काळ, अतितापमान व कडाक्याची थंडी सारख्या घटकांचा अन्न धान्याच्या उत्पादनावर विपरीत परिणाम दिसून येतो. नैसर्गिक अपत्यावर मात करत शेतकरी बांधव शेतीमध्ये विविध प्रयोग करताना दिसत आहेत. काळानुसार भारतीय शेतकरीही आधुनिक गोष्टीवर भर देवून पाण्याची काटकसर करत सूक्ष्म सिंचनाकडे वळू लागला आहे. शेतकरी पाण्याचा, खतांचा, सरकारी योजनाचा, कीटकनाशकांचा, अत्याधुनिक मशनरींचा वापर सहजरित्या व काटेकोर नियोजनबद्द पद्धतीने पार पाडत आहे. शेतीही पूर्णतः निसर्गावर अवलंबून असून भारतामध्ये शेताला जोडधंद्या शिवाय वेगळे केले जाऊ शकत नाही. तरी जनावरे तसेच पोल्ट्री संगोपना सारख्या व्यवसायत शेतकऱ्यांनी यशोगाथा दिल्या आहेत. तसेच विविध पिकांवरती जैविक व रासायनिक रसायनाचा, खतांचा योग्य तो वापर व कष्टाची सांगड घालून भारताला उत्पादनामध्ये अव्वल स्थान मिळवून दिले आहे. अश्याच आधुनिक शेतकऱ्यांसाठी अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने अॅनरॉइड मोबाईलसाठी मोफत कृषिक" अॅप प्ले स्टोर वरती उपलब्ध केले आहे. यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन “कृषिक” टाईप केल्यास अॅप इनस्टॉल करता येईल.

अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट विषयी:
ग्रामीण भागातील शेतकरी व त्यांचे कुटुंब केंद्रस्थानी मानून अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टची स्थापना १९७१ मध्ये झाली. ट्रस्टनी सुरुवातीच्या काळात पाणी, दुष्काळा वरील उपाय योजना, कृषी तंत्रज्ञान या वर मुलभूत काम केले आहे. शेतीच्या जोडीला शेतीपूरक जोड धंदे, जलसिंचन योजना, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुकुटपालन, रोपवाटिका, रेशीम व्यवसाय यामध्ये ट्रस्टनी मोठ्या प्रमाणात काम केले आहे.
आजच्या युगात मोबाईल हा शेतकर्‍यांचा नवा मित्रच आहे. या मोबाईल सेवेमुळे कृषीविषयक माहितीचे सर्वसामान्य शेतकर्‍यांपर्यंत विकेंद्रीकरण होण्यास मदत होईल. यासाठी अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टनी आधुनिक पिक व्यवस्थापन पद्धतीचा विचार करून कृषिक अॅप तयार केले आहे.


कृषिक अॅपचे मुख्य घटक
हवामान अंदाज: पुढील ७ दिवसांसाठी तालुका निहाय हवामान अंदाज
कृषि सल्ला: पिक सल्ला, जनावरे, कुककूटपालन आणि शेळीपालन सल्ला.
कृषि गणकयंत्र: कृषि उपयुक्त विविध गणकयंत्रे जसे कि ड्रिप डीझाईन खर्च, खतमात्रा शिफारस, द्रावण रूपांतरण, आदर्श चारा इ.
उत्पादने: कृषि विज्ञान केंद्र, बारामती आणि बारामती अॅग्रो पशु व पक्षी आहार उत्पादने खरेदीसाठी उपलब्ध.
कृषिवार्ता: शेतीविषयक, आयात-निर्यात, योजना, तंत्रज्ञान, चलन इ. विषयी ताज्या बातम्या.
गाईड: पीकनिहाय लागवड/ पेरणी ते काढणी पर्यंत सारांश
बाजारभाव: देशातील प्रमुख बाजारपेठेचे मुख्य शेतीमालाचे रोजचे बाजारभाव.
कृषिक प्लस: सेंद्रिय खते तसेच शाश्वत शेती, पशु संवर्धन व इतर शेतीविषयक उपयुक्त वेबसाईटस.
कृषिक तज्ञ: प्रगतशील शेतकरी आणि तज्ञांनी लिहलेले शेती व सलंग्न विषयक लेख.
तसेच अभिप्राय/ शंका, शासकीय कृषि योजना, शारदा कृषि वाहिनी इ. उपलब्ध


Post a Comment (0)