वेल वर्गीय भाजीपाला पिकातील रोग व्यवस्थापन

वेल वर्गीय पिके

वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये मोझॅक, ग्रीन मोटल मोझॅक, यलो व्हेन मोझॅक, वॉटरमेलॉन बड नेक्रॉसीस, फायलोडी इ. विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. कुकुंबर मोझॅकचा प्रसार मावा किडीमुळे होतो. हा विषाणू माठ, रानपोपटी, कांगुणी गवतावर; तसेच टोमॅटो, मिरची, वांगी, पालक, चवळी, गाजर या सहजीवी पिकांवर असतो. कलिंगड आणि भोपळ्यावरील ग्रीन मोटल मोझॅकचा प्रसार संसर्ग, बियाण्याद्वारे होतो. तसेच हा रोग चंदनबटवा, धोतरा गवतावर व सहजीवी पिकांवर असतो.

वेल वर्गीय पिकातील फळकूज/ फळसड व्यवस्थापन

 कारली, खरबूज, कलिंगड, भोपळा यावरील मोझॅक स्पर्श, मावा किडीमार्फत पसरतो. यलो व्हेन मोझॅक पांढरी माशी व स्पर्शाने; तर कलिंगडामधील बड नेक्रोसीसचा प्रसार फूलकिडे व स्पर्शाने होतो. कुकुरबीट फायलोडीचा प्रसार तुडतुड्यांमार्फत होतो. विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास, विशेषतः नवीन पानावर हिरवट डाग दिसून येतात व पानाचा इतर भाग पिवळसर दिसतो. पाने वाकडी होवून गुंडाळली जातात. ती लहान होतात. पानाच्या शिरा पिवळसर होतात. कांडे आखूड राहते. नवीन फळे वेडीवाकडी, लहान, हिरवट-पिवळसर आणि राठ दिसतात. झाडाची वाढ खुंटते. फुले-फळे कमी प्रमाणात लागतात. कलिंगडामध्ये बड नेक्रॉसीसमुळे वेलीचा शेंडा तपकिरी पडून शेवटी काळा होऊन वेल जळते. वेलीवर शेंड्याकडून खोडाकडे तपकिरी चट्टे पडतात. रोगाचा प्रादुर्भाव फळांवर येऊन त्यावर गोलाकार वर्तुळे दिसतात. 

🛡️ उपाययोजना 

👉 विषाणूजन्य रोग असलेल्या सहजीवी पिकांचा नायनाट करावा. 

👉 निरोगी झाडांवरील फळांचे किंवा प्रमाणित बी वापरावे. 

👉 रोगांचा प्रसार करणाऱ्या किडींचे शिफारशीत कीडनाशक वापरून वेळीच नियंत्रण करावे. 

👉 रोगट झाडे दिसताच त्यांचा उपटून नायनाट करावा.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post