कोबी वर्गीय पिके
कोबीवर्गीय पिकांमध्ये सापळा पिक म्हणून मुख्य पिकामध्ये मोहरीच्या ओळी ठराविक अंतराने लावल्यास चौकोनी
ठिपक्यांचा पतंग (डायमंड बॅक मॉथ) व मावा या किडींचा प्रादुर्भाव प्राथमिक अवस्थेतच नियंत्रित करता येतो. पुनर्लागवडीपूर्वी १५ ते २० दिवस अगोदर मुख्य पिकाच्या २५ ओळींनंतर आणि कडेने दोन ओळी मोहरी पेरावी. मुख्य पिकाच्या पुनर्लागवडीनंतर मोहरीवर अळ्या व मावा प्रादुर्भाव दिसू येताच, क्लोरपायरीफॉस (२० ईसी) १ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सापळा पिकाची लागवड जास्त दाट न करता योग्य अंतर ठेवून करावी. सापळा पिकावरील अन्य रोग, किडी मुख्य पिकावर प्रस्थापित न होता लवकर नियंत्रणात आणाव्यात.कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.