उन्हाळ्यात होणारा परिणाम
🍌अधिक तापमान व तीव्र सूर्यप्रकाश
👉🏽तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यावर झाडांची प्रकाशसंश्लेषण क्रिया मंदावते. तीव्र सूर्यप्रकाशामुळे पानांची पश्चिमेकडील कडा करपते.
👉🏽नवीन लागवड केलेल्या रोपांच्या पानांची सुरळी होऊन पाने उमलत नाहीत. पाने पांढरी राहून करपतात. करपलेल्या ठिकाणी काळे डाग उमटतात.
👉🏽तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यावर झाडांमधील पाण्याचे होणारे उत्सर्जन बाष्पीभवनाद्वारे वेगाने होते. झाडांमधील विकर आणि संप्रेरकांची कार्यक्षमता कमी होते. बऱ्याचदा ते नष्ट होतात.
👉🏽उन्हाळ्यात जमिनीचे तापमान वातावरणातील तापमानापेक्षा २-३ अंश सेल्सिअसने अधिक असते. यामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत जातो. याचा झाडाच्या अन्नद्रव्य शोषून घेण्याच्या क्रियेवर विपरित परिणाम होतो. मुळांची वाढ खुंटते.
👉🏽वातावणातील आर्द्रता १०-२० टक्क्यांपर्यंत खालावते. या सर्व बाबींचा परिणाम केळीच्या एकूण वाढीवर होतो. वाढ खुंटते.
👉🏽घड निसवणीच्या अवस्थेत असताना निसवण पूर्णपणे न होऊन घड अडकतात, बाहेर पडत नाही. निसवलेल्या घडातील वरच्या बाजूच्या फण्या तीव्र सूर्यप्रकाशामुळे करपतात आणि वाळून जातात. घडांचा दांडा काळा पडून घड सटकण्याचे व फण्या गळण्याचे प्रमाण वाढते. झाडे उन्मळून पडण्याचे प्रमाण वाढते.
🍌उष्णलाटा, वेगवान वारे
👉🏽उष्णलाटांमुळे बागेतील तापमान वाढते, आर्द्रता कमी होते, बाष्पीभवनाचा वेग वाढतो. याचा विपरित परिणाम झाडांच्या वाढीवर व घड पोसण्यावर होतो.
👉🏽वेगवान वाऱ्यामुळे झाडांची पाने फाटतात. परिणामी प्रकाशसंश्लेषण क्रिया मंदावते.
👉🏽वादळी वारा व गारपिटीमुळे झाडांची पान फाटून पूर्णंत नष्ट होतात, घड पडतात, घड व खोडावर जखमा होतात, झाडे उन्मळून पडतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अधिक माहितीसाठी आठवडी पिक सल्ला,कृषी वार्ता साठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.