रब्बी ज्वारी बीज प्रक्रीया व ज्वारी सुधारित जातींची निवड

 रब्बी ज्वारी



रब्बी ज्वारीची पेरणी करताना रोपावस्थेत खोडमाशी आणि खोडकिडीचा प्रादुर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी थायामेथोक्झाम (३० एफ.एस.) १० मिलि प्रतिकिलो बियाणे या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. रब्बी ज्वारी काणी रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पेरणीपूर्वी गंधक (३०० मेष) ४ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर ॲसिटोबॅक्टर आणि अॅझोटोबॅक्टर प्रत्येकी २५ ग्रॅम अधिक स्फुरद विरघळणारे जिवाणू २५ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. टीप - खरेदी केलेल्या बहुतांश बियांणावर कीडनाशकाची बीजप्रक्रिया केलेली असते. अशी बीजप्रक्रिया झालेली नसल्याची खात्री करून योग्य ती बीजप्रक्रिया करावी.


                                             

रब्बी ज्वारीच्या दर्जेदार उत्पादनासाठी संकरित व सुधारित जातींची निवड करावी. जमिनीच्या खोलीनुसार जातींची निवड केल्यास अधिक उत्पादन मिळते. ज्वारी पेरणी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या काळात करावी. पाऊस आणि जमिनीतील उपलब्ध ओलाव्याचा अंदाज घेऊन पेरणीचे नियोजन करावे. कोरडवाहू आणि बागायती क्षेत्रासाठी रब्बी ज्वारीचे शिफारस केलेल्या सुधारित/संकरित जातींची जमिनीच्या प्रकारानुसार लागवड करावी.

 ✨जमिनीच्या प्रकारानुसार जातीची निवड हलकी जमीन (खोली ३० सें.मी) : फुले अनुराधा, फुले माऊली मध्यम जमीन (खोली ६० सें.मी) : फुले सुचित्रा, फुले माऊली, परभणी मोती, मालदांडी ३५-१ भारी जमीन (६० सें.मी. पेक्षा जास्त) : सुधारित वाण : फुले वसुधा, फुले यशोदा, सी. एस. व्ही. २२,पी. कें. व्ही. क्रांती, परभणी मोती संकरित वाण : सी. एस. एच. १५ आणि सी.एस.एच. १९ बागायती : फुले रेवती, फुले वसुधा, सी.एस.व्ही. १८, सी.एस.एच.१५, सी.एस.एच. १९ हुरड्यासाठी : फुले उत्तरा, फुले मधुर लाह्यांसाठी : फुले पंचमी पापडासाठी : फुले रोहिणी

कृषिक अँप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

1 Comments

Post a Comment
Previous Post Next Post