संत्रा-मोसंबी-लिंबू
रोग व्यवस्थापन
फायटोफ्थोराग्रस्त झाडावर मेटॅलॅक्झील एम + मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.७५ ग्रॅम किंवा फोसेटील एएल २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी प्रमाणे संपूर्ण झाड ओले होईपर्यंत फवारणी करावी. उर्वरीत द्रावण झाडाभोवती आळ्यातही टाकावे.
झाडाच्या बुंध्यावर २ फुटापर्यंत बोर्डोपेस्ट ब्रशच्या साह्याने लावावी.
बोर्डोपेस्ट तयार करण्याची पद्धत - १ किलो मोरचूद व १ किलो चूना वेगवेगळा ५ लिटर पाण्यात रात्रभर भिजवून, दुसऱ्या दिवशी सकाळी एकत्र करून पेस्ट तयार करावी.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.