आडसाली ऊस
ऊस पिकासाठी जेवढी मुख्य आणि दुय्यम अन्नद्रव्यांची आवश्यकता आहे, तेवढीच सूक्ष्म अन्नद्रव्यांची सुद्धा अवश्यकता असते. मल्टि मायक्रोन्युट्रीयंट आणि मल्टि मॅक्रोन्युट्रीयंट या द्रवरूप खताची प्रत्येकी २ लिटर प्रति २०० लिटर पाणी या प्रमाणात एकत्रित पहिली फवारणी लागणीनंतर ६० दिवसांनी आणि ३ लिटर प्रति ३०० लिटर पाणी या प्रमाणात दुसरी फवारणी ९० दिवसांनी केली असता उत्पादनात वाढ होते.
सुरु ऊस
पीक संरक्षण
तपकिरी ठिपके - सध्याच्या ढगाळ हवामानामुळे पिकावर या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. नियंत्रणासाठी कार्बेन्डाझीम १ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. ऊस मोठा असल्यास बांबूला गन जोडून व्यवस्थित फवारणी करावी.
तांबेरा - प्रादुर्भाव दिसून आल्यास, नियंत्रणासाठी टेब्युकोनॅझोल १ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणात १० ते १५ दिवसांच्या अंतराने स्टिकरचा वापर करुन दिन ते तीन फवारण्या कराव्यात.
पांढरी माशी - प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यास, नियंत्रणासाठी डायमेथोएट (३० इसी) २.६ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
कृषिक अँप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.