सोयाबीन पिवळे पडणे (क्लोरोसिस)
यावर्षी सोयाबीनची पेरणी उशिराने झालेली आहे. तसेच मोजकाच पाऊस पडून त्यानंतर पावसाने विश्रांती घेतलेली आहे. त्यासोबतच ढगाळ वातावरणामुळे जमिनीतून अन्नद्रव्ये न घेता आल्यामुळे सोयाबीन रोप अवस्थेतच पिवळे-पांढरे पडत आहे. लोह या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे सोयाबीनच्या झाडामध्ये ‘क्लोरोसिस’ लक्षणे निर्माण होतात. ही एक शारीरिक विकृती आहे. लोहाची कमतरता विशेषत: निचरा कमी होणाऱ्या चुनखडीयुक्त जमिनीत होते. वनस्पतींमध्ये क्लोरोफिल निर्मितीसाठी लोह आवश्यक असते. बहुतेक जमिमीनींत वनस्पतींच्या आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात लोह असते. तथापि, ज्या जमिनीचा सामू साडेसातपेक्षा जास्त असतो त्या जमिनीतील लोह फेरस या उपलब्ध स्थितीत न राहता फेरीक स्वरूपात जातो. तो पिकाला शोषून घेता येता नाही. त्यामुळे पिकावर लोहाची ��मतरता दिसते. जमिनीत मुळांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने देखील मुळांद्वारे लोह कमी शोषला जाऊन क्लोरासीस होतो.
🛡 व्यवस्थापन
👉🏽शेतात वाफसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असेल ते काढण्याची सोय करावी.
👉🏽वाफसा आल्यानंतर पीक ३०-३५ दिवसांचे होण्यापूर्वी एक कोळपणी करावी.
👉🏽मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-II ५ ग्रॅम किंवा ५ मि.लि. अधिक १९-१९-१९ विद्राव्य खत १० ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता वाटल्यास आठ ते दहा दिवसांनी पुन्हा फवारणी करावी.
👉🏽पाण्याचा ताण पडल्यास स्प्रिंकलरने संरक्षित पाणी द्यावे.
👉🏽सिंचन सुविधा उपलब्ध नसल्यास १३-०-४५ विद्राव्य खत १० ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून आवश्यकतेनुसार आठ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अधिक माहितीसाठी आठवडी पिक सल्ला,कृषी वार्ता साठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.