संत्रा-मोसंबी-लिंबू
आंबिया बहरातील फळांचे व्यवस्थापन
एक आठवड्यापेक्षा अधिक काळ पावसामध्ये उघडीप मिळाल्यास आंबिया बहराच्या फळांची वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी १.५ किलो पोटॅशिअम नायट्रेट अधिक २, ४-डी १.५ ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
आंबिया बहरचे फळगळ कमी करण्याकरिता, १.५ ग्रॅम २, ४-डी किंवा जिबरेलीक आम्ल अधिक १०० ग्रॅम कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यूपी) अधिक १ किलो युरिया प्रति १०० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. या द्रावणाची पुढील फवारणी १५ दिवसांनी पुन्हा करावी. जिबरेलिक आम्ल वापरताना १.५ ग्रॅम प्रति १० मि.लि. अल्कोहोल या प्रमाणात द्रावण करून त्याचा वापर करावा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अधिक माहितीसाठी आठवडी पिक सल्ला,कृषी वार्ता साठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.