पिल्ले कापणे
केळीचे कंद किंवा ऊतिसंवर्धीत रोपे लावल्यानंतर तीन ते चार महिन्यांनी मुख्य खोडालगत पिल्ले येण्यास सुरूवात होते. ही पिल्ले मुख्य पिकाशी अन्नद्रव्ये, सूर्यप्रकाश, पाणी या बाबतीत स्पर्धा करतात. त्यामुळे मुख्य पिकाची वाढ कमी होते. निसवण उशिरा होते आणि फळांच्या दर्जात घट होऊन घडाची पक्वताही लांबते. त्यामुळे अशी सर्व पिल्ले दर १५ ते २५ दिवसांनी धारदार विळ्याच्या सहाय्याने नियमितपणे कापावीत. त्यांचा वापर पशुखाद्य, आच्छादन किंवा कंपोस्ट बनविण्यासाठी करावा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अधिक माहितीसाठी आठवडी पिक सल्ला,कृषी वार्ता साठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.