केळी बागेतील आच्छादनाचा वापर

 केळी

आच्छादनाचा वापर पिकास दिलेल्या पाण्याचा पुरेपूर उपयोग होऊन पाण्याच्या मात्रेत बचत व्हावी, यासाठी दोन ओळींमध्ये खोडांभोवती केळीची वाळलेली निरोगी पाने, उसाचे पाचट, बाजरीचे सरम, गव्हाचा भुसा, डाळवर्गीय पिकांचे काड इत्यादी सेंद्रिय पदार्थांचा १५ सें.मी. जाडीचा थर देऊन आच्छादन करावे. अशा प्रकारे आच्छादन केल्याने जमिनीतून होणाऱ्या पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग कमी होतो, जमिनीचे तापमान नियंत्रित राहिल्याने मुळांना इजा पोहचत नाही. सेंद्रिय पदार्थ कुजून त्यापासून पिकाला अन्नद्रव्ये व सेंद्रिय आम्ले उपलब्ध होतात, तसेच तणांचे प्रमाण कमी होऊन उत्पन्नात देखील वाढ होते.

अधिक माहितीसाठी आठवडी पिक सल्ला,कृषी वार्ता साठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.




Post a Comment (0)
Previous Post Next Post