केळी बाग उन्हाळ्यातील व्यवस्थापन

 केळी

उन्हाळ्यातील अधिक तापमान, वेगाने वाहणारे वारे तसेच गारपीट इत्यादींचे मृग बागेवर होणारे विपरीत परिणाम लक्षात घेता केळी संशोधन केंद्राने फेब्रुवारी महिन्यात केळी लागवडीची शिफारस केली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ५ x ५ फूट अंतरावर केळीची लागवड करून शिफारशीप्रमाणे पाणी व पोषक अन्नद्रव्यांचे योग्य व्यवस्थापन करावे. फेब्रुवारी महिन्यात लागवड केलेली केळी पुढच्या जानेवारी - फेब्रुवारीपर्यंत कापणीस तयार होते. उन्हापासून संरक्षणासाठी केळीच्या लागवडीत दोन ओळींच्या मध्ये ताग किंवा धैंचा ही हिरवळीची पिके घ्यावीत. बागेभोवती २ मीटर अंतरावर सजीव कुंपण करण्यासाठी केळी लागवड करतेवेळी शेवरीची लागवड करावी. त्यामुळे वादळी वाऱ्यामुळे केळीची पाने फाटणे आणि उन्हाळयातील उष्ण व हिवाळ्यातील थंड वाऱ्यापासून बागेचे संरक्षण होते. वाऱ्यामुळे झाडे कोलमडून होणारे आर्थिक नुकसान टळते.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.





Post a Comment (0)
Previous Post Next Post