आंबा
आंबा मोहोराच्या दांडीवर फळे पिवळी होऊन पडताना किंवा देठाजवळ पिवळी रिंग तयार होताना दिसते. अशा वेळी ऑक्झिन संजीवकाची कमतरता निर्माण होऊन अॅबसेसिक अॅसिडनिर्मिती होते. त्यामुळे गळ झालेली दिसते. अशा वेळी फळधारणेनंतर एकाच दांडीवर भरपूर फळे धरली असल्यास उत्तम वाढ होणारी एक ते दोन फळे ठेऊन उरलेली फळे काढून टाकावी. फळे वाटाण्याएवढी असताना आणि त्यानंतर पुन्हा पंधरा दिवसांनी नॅप्थेलिन अॅसेटिक अॅसिड (एन.ए.ए.) २० मिलिग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून (२० पी.पी.एम.) फवारणी करावी.