भुईमुग
पेरणी पद्धत
🥜रुंद वाफा (इक्रिसॅट)
पद्धत पूर्व मशागत केलेल्या जमिनीत ट्रॉपिकल्चर या यंत्राने गादी वाफे (रुंद सरीवाफे) तयार करावेत. अशा वाफ्याची जमिनी लगत रुंदी १५० सें.मी. तर वरची रुंदी १२० सें.मी. ठेवावी. वाफ्याची जमिनीपासून उंची १० ते १५ सें.मी. ठेवावी. किंवा १.५० मीटर अंतरावर ३० सें.मी.च्या नांगराने सऱ्या पाडाव्यात. या पद्धतीत १.२० मीटर रुंदीचे आणि १५ सें.मी. उंचीचे वाफे तयार होतील. अशाप्रकारे तयार केलेल्या वाफ्याची लांबी जमिनीच्या उतारानुसार ४० ते ५० मीटर ठेवावी. हलक्या जमिनीत मधल्या दोन सऱ्यांपर्यंत पाणी पोचत नाही. अशा वेळेस ९० सें.मी. अंतरावर सऱ्या पाडून गादी वाफे तयार करावेत. अशा वाफ्यावर ३० x १० सें.मी. अंतरावर भुईमुगाची टोकण करावी व पाणी द्यावे.
✨
इक्रिसॅट पद्धतीचे फायदे ✔️गादीवाफ्यावरील जमीन भुसभुशीत राहत असल्याने मुळांची कार्यक्षमता वाढून पिकाची वाढ जोमदार होते व उत्पादनात वाढ होते.
✔️जमिनीत पाणी व हवा यांचे प्रमाण संतुलित ठेवता येते, त्यामुळे पिकाची कार्यक्षमता वाढते.
✔️पिकास पाण्याचा ताण बसत नाही, तसेच जास्त पाणी दिल्यामुळे सरीतून पाण्याचा निचरा करता येतो.
✔️तषार सिंचन पद्धतीने पाणी देणे सोयीस्कर होते.
✔️या पद्धतीत पाटाने पाणी देता येते. यासाठी वेगळी रानबांधणी करावी लागत नाही.
✔️सतुलित खत व्यवस्थापन केल्याने अन्नद्रव्ये कमतरतेची लक्षणे दिसणार नाहीत व योग्यप्रकारे पिकाची वाढ होऊन उत्पादनात वाढ होते.