केळी कांदेबाग व्यवस्थापन

 केळी
कांदेबाग व्यवस्थापन


👉ऑक्टोबर महिन्यात लागवड केलेल्या बागा सध्या शाखीय वाढीच्या अवस्थेत आहेत. या बागांना वेळापत्रकानुसार खतांच्या मात्रा द्याव्यात. जमिनीतून खते देताना युरिया ८२ ग्रॅम व म्युरेट ऑफ पोटॅश ८३ ग्रॅम प्रति झाड या प्रमाणे द्यावे. ड्रीपमधून खते देताना प्रति एक हजार झाडांसाठी युरिया १३.५ किलो अधिक म्युरेट ऑफ पोटॅश ८.५ किलो प्रति आठवड्याला द्यावे.
👉प्रति झाड प्रति दिन ४.५ ते ६.५ लिटर ठिबकद्वारे पाणी द्यावे.
👉बागेतील तसेच बांधावरील तण काढून बाग स्वच्छ ठेवावी.


अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post