संत्रा-मोसंबी-लिंबू
मृग बहार व्यवस्थापन या महिन्यात मृग बहाराची फळ काढणी सुरू होईल. योग्य पक्वतेच्या फळांची काढणी करून बाजारामध्ये विक्रीसाठी पाठवावी. मृग बहाराची फळे तोडणीनंतर झाडावरील साल काढून टाकावी. झाडावर कार्बेन्डाझीम १ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.