संत्रा-मोसंबी-लिंबू | पीक संरक्षण |

 संत्रा-मोसंबी-लिंबू

पीक संरक्षण 

👉खोड कीड किंवा ईंडरबेला या साल खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी, अळीच्या छिद्रावरून जाळे काढावे. इंजेक्शनच्या मदतीने क्लोरपायरीफॉस (५० ईसी) ५ मि.लि. प्रति लिटर पाणी हे द्रावण छिद्रात टाकावे. त्यावर कापसाचा बोळा वरील द्रावणात बुडवून लावावा. ओली माती, रॉकेल किंवा पेट्रोल वापरू नये.
👉 अंबिया बहाराच्या वेळी सिट्रस सायला नियंत्रणाकरिता, इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) ०.५ मि.लि. किंवा क्विनॉलफॉस (२५ ईसी) १.५ मि.लि. किंवा डायमेथोएट (३० ईसी) २ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास वरीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी. परंतु कीटकनाशक बदलून वापरावे.
👉 पाने पोखणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी सायपरमेथ्रीन (१० ई.सी.) २ मि.लि. किंवा डायमेथोएट (३० ईसी) १.५ मि.लि. प्रति लिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी.
👉 मावा किडीच्या नियंत्रणासाठी, डायमेथोएट (३० ईसी) १.५ मि.लि. किंवा क्विनॉलफॉस (२५ ईसी) १.५ मि.लि. प्रति लिट र पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
👉पाने खाणार्‍या अळीच्या नियंत्रणासाठी, सायपरमेथ्रीन (१० ईसी) २ मि.लि. किंवा डायमेथोएट (३० ईसी) १.५ मि.लि. प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
👉 झाडाच्या बुंध्यामधून डिंक्याचा स्राव सुरू असल्यास असा डिंक तीक्ष्ण चाकूने खरडून घ्यावा. ती जागा पोटॅशिअम परमॅग्नेट १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या द्रावणाने धुवून घ्यावी. त्या ठिकाणी मेटालॅक्झील एम ४%+ मॅन्कोझेब ६४% (संयुक्त बुरशीनाशक) किंवा फोसेटिल एएल यांची पेस्ट (प्रमाण १०० ग्रॅम प्रति लिटर पाणी) लावावी.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post