उन्हाळ्यातील संत्रा-मोसंबी-लिंबू पिकातीचे सिंचन व्यवस्थापन

 संत्रा-मोसंबी-लिंबू

सिंचन व्यवस्थापन या महिन्यात उष्णतामानात वाढ होत असल्यामुळे ७ ते १० दिवसांच्या अंतराने दुहेरी आळे पद्धतीने पाणी द्यावे. ठिबक सिंचन संच असल्यास १ ते ४, ५ ते ७ व ८ वर्षावरील झाडांना अनुक्रमे १२ ते ५३, ७८ ते १२७ व १४५ ते १८० लिटर प्रति दिवस पाणी द्यावे. शेतातील गवत, तणस, गव्हांडा, कुटार या शिल्लक अवशेषांचे झाडाभोवती ५ ते १० सें.मी. थर देऊन आच्छादन करावे. त्यामुळे बाष्पीभवन कमी होते व जमिनीत ओलावा टिकून राहतो. अंबिया बहाराची फळगळ कमी होण्यास मदत होते.


अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post