टोमॅटो पिकातील रोग नियंत्रण

टोमॅटो

रोग नियंत्रण
⭕️ पर्णगुच्छ रोगाचा प्रसार पांढऱ्या माशीद्वारे होतो. पाने वरच्या बाजूस वळालेली दिसतात. झाड खुजे राहून पर्णगुच्छासारखे दिसते.
⚔️पांढरी माशीच्या बंदोबस्तासाठी शिफारशीनुसार फवारणी करावी.
⭕️लवकर येणारा करपा पाने पिवळी पडतात. खोडावर, फांद्यावर तपकिरी व काळपट रंगाचे वलयांकित ठिपके दिसतात. ⚔️रासायनिक फवारणी (प्रतिलिटर पाणी) ॲझोक्सिस्ट्रॉबीन (२३ एससी) १ मि.लि. किंवा किटाझीन (४८ ईसी) १ मि.लि. किंवा पायरॅक्लोस्ट्रोबीन (२५ डब्ल्यूजी) ०.५ ग्रॅम
⭕️मर रोग पानाच्या शिरा रंगहीन होऊन पाने पिवळी पडतात. झाडाच्या पेशी तपकरी होऊन कुजतात. त्यामुळे अन्नपुरवठा खंडित होतो. परिणामी, झाडाची वाढ खुंटते.
⚔️रासायनिक आळवणी (प्रतिलिटर पाणी) मेटॅलॅक्सिल-एम (३१.८ ईएस) २.५ ग्रॅम किंवा थायोफेनेट मिथाईल (३८%) + कासुगामायसिन (२.२१% एससी) (संयुक्त बुरशीनाशक) २.५ मि.लि.
⭕️फळसड फळधारणेच्या अवस्थेत जास्त प्रादुर्भाव दिसतो. फळांवर टोकाच्या बाजूस गोल तपकिरी डाग पडतात. फळे रंगहीन होऊन साल कातड्यासारखी होऊ फळे सडतात.
⚔️रासायनिक फवारणी (प्रतिलिटर पाणी) क्रेसॉक्सिम मिथिल (१८%) + मॅन्कोझेब (५४% डब्ल्यूपी) (संयुक्त बुरशीनाशक) १.५ ग्रॅम किंवा कॅप्टन (७०%) + हेक्साकोनॅझोल (५% डब्ल्यूपी) (संयुक्त बुरशीनाशक) १ ग्रॅम ⭕️बक्टेरियल कॅंकर (देवी रोग) पाने, खोड आणि देठावर फिक्कट हिरवे ठिपके, रेषा दिसतात. पाने अर्धवट जळालेली, वाकडी दिसतात. फळावर गर्द तपकिरी ते काळे उंचवट्यासारखे खडबडीत डाग पडतात. ⚔️रासायनिक फवारणी (प्रतिलिटर पाणी) कॉपर ऑक्सिक्लोराइड २.५ ग्रॅम

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post