संत्रा-मोसंबी-लिंबू | मृग बहार व्यवस्थापन |

 संत्रा-मोसंबी-लिंबू

🍊 मृग बहार व्यवस्थापन 


👉 मृग बहाराच्या संत्रा व मोसंबीच्या फळांच्या झाडांवर ठिंबक सिंचन पद्धतीने सिंचन करावे. त्यासाठी सहा वर्षाच्या झाडाला ६२ लिटर, ८ वर्षाच्या झाडाला ८२ लिटर आणि १० वर्षाच्या झाडाला ९२ लिटर पाणी/ दिवस/ झाड द्यावे. लिंबूच्या ६ वर्षांच्या झाडाला २९ लिटर आणि १० वर्षाच्या झाडाला ८७ लिटर पाणी/ दिवस/ झाड द्यावे.

👉 मृग बहाराच्या फळांचा आकार वाढविण्याकरिता फवारणी जिबरेलिक अॅसिड १ ग्रॅम अधिक मोनो पोटॅशिअम फॉस्फेट (०-५२-३४) किंवा डाय अमोनियम फॉस्फेट (१२-६१-०) किंवा पोटॅशिअम नायट्रेट (१३-०-४५) १.५ किलो प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे १५ ते २० दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या घ्याव्यात.

👉 कोळी किडीचा प्रादुर्भाव या महिन्यामध्ये मृग बहाराच्या फळांवर दिसतो. कोळीमुळे हिरव्या फळांवर तांबूस रंगाचे चट्टे दिसतात. ते पुढे काळ्या रंगाचे होतात. याला स्थानिक भाषेमध्ये ‘लाल्या’ म्हणतात. कोळी नियंत्रणासाठी डायकोफॉल १.५ मि.लि. किंवा इथिऑन २ मि.लि. किंवा विद्राव्य गंधक ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने घ्यावी.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post