पशु संवर्धन :-
वासरांचे थंडीपासून रक्षण करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. वासरांचा गोठा चांगला निचरा होणारा असावा. थंड हवेच्या झोतापासून संरक्षण होण्यासाठी गोठ्याला पोते बांधावे. वासरांना दुपारच्या वेळेस उन्हामध्ये गोठ्याच्या बाहेर काढावे. गोठा नेहमी कोरडा असावा. उबदारपणासाठी भुसा जनावरांना बसण्याच्या ठिकाणी पसरावा. हिवाळ्याच्या दिवसांत वासराला कोमट पाण्यातून इलेक्ट्रोलाईट पावडर मिसळून पाजावी. वासराला श्वास घेण्यात त्रास होत नाही ना यावर बारकाईने लक्ष ठेवावे. वासराला श्वास घेण्यास त्रास होत असल्यास नाकामध्ये निलगिरी तेलाचे दोन-चार थेंब टाकावेत.