संत्रा-मोसंबी-लिंबू कीड व्यवस्थापन

 संत्रा-मोसंबी-लिंबू

कीड व्यवस्थापन
⭕️सिट्रस सायला


बागेमध्ये पाणी देऊन ताण मोडला जातो. त्यानंतर नवीन पालवी किंवा नवतीची सुरवात होते. याच वेळी सिट्रस सायला व त्याची पिले पानांतून रस शोषण करतात. नवतीच्या पानांची गळ होऊन फांद्या सुकतात. फळधारणेवर अनिष्ट परिणाम होतो. या किडीद्वारे ‘ग्रिनिंग’ आणि ‘शेंडेमर’ या रोगांचाही प्रसार होतो. वेळीच नियंत्रण न केल्यास झाडावरील फुले आणि फळे गळून पडतात. झाडावर जास्त फळे येत नाहीत. नंतर बहार येत नाही. या किडीच्या प्रादुर्भावामुळे १०० टक्के नुकसान होते.
⚔️नियंत्रण फवारणी (प्रति लिटर पाणी) क्विनॉलफॉस १ मि.लि. किंवा नोव्हॅल्युरॉन ०.५५ मि.लि. किंवा डायमेथोएट २ मि.लि. किंवा ॲसिफेट १ ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रिड ०.५० मि.लि. आवश्‍यकतेनुसार दुसरी फवारणी दहा दिवसांनी कीटकनाशक बदलून करावी.

⭕️खोडकिडा

 किंवा इंदरबेला किंवा साल खाणारी अळी नियंत्रण अळीच्या छिद्रावरून जाळे काढावे. इंजेक्शनच्या मदतीने क्लोरपायरीफॉस (२० ईसी) ५ मि.लि. प्रति लिटर पाण्यात बनवून छिद्रात टाकावे. कापसाचा बोळा या द्रावणात बुडवून छिद्र बंद करावे. ओली माती, रॉकेल किंवा पेट्रोल वापरू नये.



अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post