संत्रा-मोसंबी-लिंबू |अंबिया बहार व्यवस्थापन|

संत्रा-मोसंबी-लिंबू

अंबिया बहार व्यवस्थापन

👉 अंबिया बहारासाठी ताणावर असलेल्या बागेमध्ये वखरणी करून घ्यावी. सिंचनासाठीचे आळे मोडलेले असल्यास दुरुस्ती करून ओलीत करावे.
👉 ठिबक सिंचन संच असल्यास १ ते ४, ५ ते ७ व ८ वर्षावरील झाडांना अनुक्रमे ७ ते ३०, ४४ ते ७२ व ८२ ते १०२ लिटर पाणी प्रति दिवस जमिनीच्या मगदुराप्रमाणे द्यावे.
👉 ठिबक सिंचन नसल्यास दुहेरी आळे पद्धतीने ८-१० दिवसांच्या अंतराने ओलीत करावे. शेतातील गवत, तणस, कुटार असल्यास आळ्यामध्ये ५ ते १० सें. मी. थर देऊन आच्छादन करावे.

👉 झाडावरील वाळलेली साल काढावी. साल काढताना थोडी ओली एक इंच फांदी कापावी. साल, फांद्या कापण्यासाठी वापरण्यासाठी घेतलेली कात्री सोडियम हायपोक्लोराइटच्या मिश्रणामध्ये बुडवून घ्यावी. त्यामुळे कात्रीद्वारे अन्यत्र होणारा रोगाचा प्रसार रोखता येईल. साल काढल्यानंतर कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर पाणी 
याप्रमाणे झाडावर फवारणी करावी.





👉 अंबिया बहार चांगल्यारीतीने येण्यासाठी जिबरेलिक अॅसिड १ ग्रॅम अधिक युरिया १ किलो प्रति १०० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.




Post a Comment (0)
Previous Post Next Post