कमी तापमानामुळे केळी पिकावर होणाऱ्या परिणामांची तीव्रता कमी करावयाच्या उपाययोजना

 केळी

कमी तापमानामुळे केळी पिकावर होणाऱ्या परिणामांची तीव्रता कमी करावयाच्या उपाययोजना


✅ केळीची लागवड १.५x१.५ किंवा १.७५x१.७५ मीटर या शिफारशीत अंतरावर करावी. जास्त अंतरावर लागवड करणे टाळावे.
✅ थंड वातावरणात केळी लागवड करणे टाळावे. लागवड शक्यतो ऑक्टोबरमध्येच पूर्ण करावी.
✅ लागवडीच्या वेळेस बागेच्या चोहोबाजूने सुरु, नेपिअर, शेवरी इत्यादी वारा प्रतिरोधक वनस्पतींची दोन-तीन ओळींत दाट लागवड करावी. यामुळे बागेतील झाडांचे थंड वाऱ्यांपासून संरक्षण होते.
✅ रासायनिक खतांच्या शिफारशीत मात्रा वेळापत्रकानुसार द्याव्यात. हिवाळ्यात केळी पिकास पालाश या प्रमुख अन्नद्रव्याची कमतरता पडू देऊ नये.
✅ शक्य असल्यास बागेस रात्री किंवा पहाटेच्या वेळी ठिबक संचाने पाणी द्यावे.
✅ जमिनीची जलधारणक्षमता वाढण्याकरिता पिकास शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे. तसेच सेंद्रिय आच्छादन करावे. यामुळे ओलावा आणि जमिनीचे तापमान योग्य राखले जाते.
✅ झाडाची लोंबणारी हिरवी निरोगी तसेच वाळलेली रोगविरहित पाने कापू नयेत. पाने खोडाभोवती तशीच लपेटून ठेवावीत. रोगग्रस्त पाने फक्त कापावीत.
✅ वाढीच्या अवस्थेनुसार प्रतिझाड ०.५-१ किलो निंबोळी खत मातीत मिसळून द्यावे. यामुळे पिकास अतिरिक्त अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. निंबोळी ढेपेमुळे मुळ्यांना इजा करणाऱ्या सुत्रकृमींपासूनही पिकाचे संरक्षण होते.
✅ बागेमध्ये उसाचे पाचट, केळीची रोगविरहीत वाळलेली पाने, सोयाबीन भुसा अशा सेंद्रिय पदार्थांचा किंवा चंदेरी पॉलिप्रॉपिलीनचे आच्छादन करावे. यामुळे जमिनीतील तापमान नियंत्रित राहते. तसेच जिवाणूंच्या संख्या वाढण्यास मदत होते.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post