आंबा
किमान तापमानात होणारी घटीमुळे आंब्याच्या फळे धरलेल्या फांद्यावर पुन्हा नवीन मोहोर येण्याची शक्यता असते. त्यामुळे अन्नाचे वहन नवीन मोहोराकडे होवून जुन्या मोहोराला असलेली वाटाणा/ गोटी आकाराच्या फळांची गळ दिसून येते. यासाठी मोहोर अवस्थेत असलेल्या आंबा झाडावर पुनर्मोहोर प्रक्रिया टाळण्यासाठी जिबरेलिक ॲसिड ५० पी.पी.एम. या प्रमाणे झाडाला पुरेसा मोहोर आला असल्याची खात्री झाल्यानंतरच झाडावरील मोहोर पूर्ण उमललेला असताना स्वतंत्र फवारणी करावी. नंतर पुन्हा मोहरीच्या आकाराची फळे झाल्यावर एक फवारणी करावी. जिबरेलिक ॲसिडची पावडर पाण्यात अविद्राव्य असल्याने प्रथम ती थोड्या अल्कोहोलमध्ये विरघळून नंतर पाण्यात मिसळावी.