केळी
निसवण सुरू असलेल्या बागेतील घड बाहेर पडल्यानंतर केळफूल कापावे. तसेच ८ ते १० फण्या ठेवून शेवटच्या फण्या कापाव्यात. घडाच्या वाढीसाठी केळफूल कापणीनंतर घडावर पोटॅशिअम डायहायड्रोजन फॉस्फेट (०.५ टक्का) ५ ग्रॅम अधिक युरिया (१ टक्का) १० ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे १५ दिवसांच्या अंतराने दोनवेळा फवारणी करावी. दुसरी फवारणी झाल्यानंतर घड २ टक्के सच्छिद्रता असलेल्या १०० गेज जाडीच्या पॉलिथीन पिशव्यांनी झाकून घ्यावेत.