संत्रा-मोसंबी-लिंबू आंबिया बहर व्यवस्थापन

 संत्रा-मोसंबी-लिंबू

🍊आंबिया बहर व्यवस्थापन 


👉 आबिया बहराच्या फळ तोडणीनंतर वाळलेल्या फांद्या किंवा सुकलेली साल काढावी. त्यानंतर त्वरित कार्बेन्डाझीम (५० डब्ल्यूपी) १ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. 

👉 जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात आंबिया बहर घेण्यासाठी झाडाला ताबडतोब ताण द्यावा. पाणी देऊ नये. अधिक चांगल्याप्रकारे ताण देण्यासाठी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये क्लोरमेक्वॅट क्लोराईड (५० एसएल) २ मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. 

👉 झाडाखालील तणे काढून बाग स्वच्छ करावी. 

👉 बुंध्याजवळ मातीचे ढीग असल्यास त्यांना तोडून मोकळे करून घ्यावे.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post