शेळी पालन |हिवाळ्यातील आरोग्य व्यवस्थापन|

 शेळी पालन :-
हिवाळ्यातील आरोग्य व्यवस्थापन

👉बऱ्याच आजारांचे मुख्य कारण म्हणजे जिवाणू, विषाणू आणि जंत यांचा प्रादुर्भाव हे असते.
👉थडीमध्ये आजार लवकर पसरतात. कारण जिवाणू व विषाणू थंड तापमानात जास्त वेळ टिकून राहतात. त्यामुळे गोठा जंतुनाशकाने आठवड्यातून एक-दोनवेळा धुऊन घ्यावा.
👉शळया-मेंढ्यांना आजूबाजूच्या परिसरात गवतावर दव असताना सकाळी चरण्यासाठी सोडू नये. कारण या वेळात जंतांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते.
👉आजार झाल्यावर तो बरा करण्यापेक्षा तो होऊ न देणे अधिक चांगले. म्हणून ठरल्यावेळी रोगप्रतिबंधक लस आणि जंतनाशक औषधे द्यावीत. शेळ्यांना लस कधीही आजार आल्यानंतर देऊ नये. कारण आजारी व विशिष्ट साथीमध्ये आजारी शेळीला लस दिल्यास तो आजार बरा न होता बळावतो.
👉हिवाळ्यात उवा, पिसू, गोचिड यांचे योग्य वेळेस नियंत्रण करणे आवश्यक आहे. बाह्य परजीवींचा उपद्रव टाळण्यासाठी पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने गोचिडनाशकाचा वापर करावा. संपूर्ण अंगावर हे द्रावण लावावे. द्रावण तोंड, डोळे या ठिकाणी लावू नये. हे द्रावण पोटात गेल्यास विषबाधा होऊ शकते.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post