आंबा फळ पिक आठवडी सल्ला

 आंबा

बहुतांश ठिकाणी झाडांना पालवी आलेली आहे. गेल्या काही दिवसांत सततच्या ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात सतत चढ-उतार होत असून किमान तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. हे किमान तापमान पालवी पक्व होऊन मोहोर लागण्यास अनुकूल नाही. यामुळे आंबा हंगाम पुढे जाण्याची शक्यता आहे. पालवी लवकर जून होण्यासाठी व आंब्याला लवकर मोहोर लागण्यासाठी ०-५२-३४ या विद्राव्य खताची १० ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणात पालवी पोपटी रंगाची असताना (पालवी आल्यानंतर १० ते १५ दिवसांनी) व किमान तापमान कमी झाल्यासच फवारणी करावी.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post