केळी बाग रोग व्यवस्थापन | करपा,कंदकुजव्या |

 केळी
रोग व्यवस्थापन
⭕️ करपा (सिगाटोका)

👉रोगट पानांचा भाग किंवा पाने कापून नष्ट करावीत.

👉शिफारशीत अंतरावर (१.५x१.५ मीटर किंवा १.८x१.८ मीटर) लागवड करावी.
👉बागेत पाणी साचून राहणार नाही आणि पाण्याचा योग्य निचरा होईल, याकडे लक्ष द्यावे.
👉ठिबक सिंचनाने पाणी देताना हवामान, वाढीची अवस्था आणि जमिनीच्या मगदुरानुसार पाण्याची मात्रा ठरवावी.
👉बाग आणि बांध नेहमी तणमुक्त व स्वच्छ ठेवावेत.
👉मख्य खोडाच्या बगलेत येणारी पिले नियमितपणे कापावीत.
👉शिफारशीत अन्नद्रव्यांची मात्रा (२००:६०:२०० ग्रॅम नत्र, स्फुरद, पालाश प्रतिझाड) वेळापत्रकानुसार द्यावी.
👉कळीचे पीक सतत न घेता पिकाची फेरपालट करावी.
👉पराथमिक लक्षणे दिसताच, क्लोरथॅलोनील २ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड २.५ ग्रॅम अधिक स्टीकर १ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे आलटून-पालटून फवारणी करावी. प्रादुर्भाव वाढल्यास, कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल १ मि.लि. अधिक स्टीकर १ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे आलटून-पालटून फवारावे.
⭕️कंदकुजव्या
👉लागवडीपूर्वी उन्हाळी खोल नांगरट करून जमीन चांगली तापू द्यावी.
👉लागवडीसाठी निरोगी कंद वापरावेत.
👉कद लागवडीपूर्वी, कॉपर ऑक्सीक्लोराईड ४ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात ३० मिनिटे बुडवावेत.
👉चांगले कुजलेले शेणखत १० किलो प्रतिझाड वापरावे.
👉लागवडीवेळी जमिनीत ब्लिचिंग पावडर ६ ग्रॅम प्रतिझाड द्यावी. एक महिन्याच्या अंतराने पुन्हा हीच प्रक्रिया करावी.
👉रोगट झाडे कंदासह उपटून नष्ट करावीत. रोगग्रस्त झाडाचे अवशेष बागेबाहेर काढून बाग स्वच्छ ठेवावी.
👉योग्य मात्रेत पाणी देऊन बाग नेहमी वाफसा स्थितीत ठेवावी. अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
👉पिकाची फेरपालट करावी.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post