पशु संवर्धन आठवडी सल्ला

 पशु संवर्धन :- 

वातावरणातील तापमान कमी झाल्यानंतर वासराला शरीराच्या तापमान नियमनासाठी अधिक ऊर्जेची गरज असते. म्हणजेच प्रत्येक अंश कमी तापमानाला एक टक्का ऊर्जेची गरज असते. अशा परिस्थितीत वासरे आपल्या शरीरातील उपलब्ध असलेली ऊर्जा उपयोगात आणतात. अशा ऊर्जेचा जास्त प्रमाणात वापर झाल्यास वासराचे वजन घटते. त्यांची प्रतिकार क्षमतादेखील कमी होते. नवजात वासरांना कोरडे करावे, जेणेकरून शारीरिक ऊर्जेचा ऱ्हास होणार नाही. वासरांना थंडीचे शहारे किंवा शरीराचे केस टवकारतात का, याकडे बारकाईने लक्ष ठेवावे. रात्रीच्या वेळी वासरांच्या अंगावर गोणपाट बांधून ठेवावे. थंडीसाठी वाळलेल्या पेंढ्यांचा बिछाना करावा. थंडीमध्ये वासरांना दिवसातून तीनवेळा खाद्य देणे गरजेचे असते. दोनवेळा खाद्य देत असल्यास सायंकाळी जास्तीचे दूध वासरास पाजावे. यामुळे रात्रीच्या वेळी जास्तीची ऊर्जा मिळेल. या काळात २०० ग्रॅम काफ स्टार्टर किंवा खुराक वाढवावा. थंडीमुळे वासरे पाणी कमी पितात, त्यामुळे रक्तातील पाण्याची पातळी कमी होते. त्यासाठी थंडीमध्ये त्यांना कोमट म्हणजेच १०१ ते १०२ अंश फॅरानहाइट इतक्या तापमानाचे पाणी पाजावे. जेणेकरून ते भरपूर पाणी पितात.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post