टोमॅटो पिकातील पाणी व्यवस्थापन


 टोमॅटो

💧पाणी व्यवस्थापन
👉 पाणी व्यवस्थापन करताना जमिनीचा मगदूर व हवामान या गोष्टी विचारात घ्याव्यात.
👉 हलक्‍या जमिनीत पाण्याच्या पाळ्या जास्त द्याव्यात व त्यामानाने चांगल्या जमिनीत पाण्याच्या पाळ्या कमी द्याव्यात.
👉 लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे. त्यानंतर आंबवणीचे पाणी द्यावे.
👉 पिकाच्या सुरवातीच्या काळात पाणी जास्त झाल्यास पानांची व फांद्यांची वाढ जास्त होते. म्हणून फुलोरा येईपर्यंत लागवडीपासून अंदाजे ६५ दिवसांपर्यंत पाणी बेताने द्यावे.
👉 पीक वाढीच्या संवेदनशील अवस्थेत पाण्याचा ताण पडू देऊ नये. पाण्याचा ताण पडल्यास फूल व फळगळ, फळ धारणा न होणे अशा समस्या उद्‍भवतात.
👉 पाणी सतत आणि जास्त दिल्यास मुळांना हवेचा पुरवठा होत नाही, रोगराई वाढीस चालना मिळते. झाडाची पाने पिवळी पडतात व उत्पादनात घट येते.
👉 हिवाळ्यात ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे व उन्हाळ्यात ६ ते ८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. तर पावसाळ्यात पावसाच्या पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी द्यावे.
👉 ठिबक संचामधून पाणी देताना पिकाची दैनंदिन पाण्याची गरज निश्‍चित करून तेवढेच पाणी मोजून द्यावे.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.





Post a Comment (0)
Previous Post Next Post