केळी बाग आठवडी सल्ला | पिक नियोजन |

 केळी

थंडीमुळे नवीन लागवड केलेल्या रोपांच्या वाढीवर परिणाम होतो. काहीवेळा पाने उमलण्यास वेळ लागतो. पाने पिवळी पडतात. जमिनीतून अन्नद्रव्य उचलण्याचा वेग मंदावून झाडाच्या वाढीवर परिणाम होतो.
✨ उपाय
👉 १९-१९-१९ हे विद्राव्य खत १० ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. यामुळे अन्नद्रव्यांचा पुरवठा होण्यास वेग वाढतो. त्याचा झाडांच्या वाढीसाठी चांगला परिणाम होतो.
👉 बागेत पहाटे किंवा रात्रीच्या वेळेस पाणी द्यावे.
👉 तीन ते चार महिने वयाच्या झाडाला २०० ग्रॅम आणि सहा महिने वयाच्या पुढील झाडाला अर्धा किलो निंबोळी पेंड आळ्यात मिसळून द्यावी. यामुळे मुळांच्या कार्यक्षेत्रात उबदारपणा वाढतो.
👉 पहाटेच्या वेळेस बागेत शेकोटी करून धूर करावा. यामुळे बागेतील तापमान वाढण्यास मदत होते.
👉 बागेच्या कडेने शेडनेट लावल्याने थंड वारे शिरण्यास अडथळा तयार होतो.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post