संत्रा-मोसंबी-लिंबू पिकातील कीड व्यस्थापन

 संत्रा-मोसंबी-लिंबू

⭕️कीड व्यवस्थापन 


👉 पाने पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी, क्विनालफॉर १.५ मि.लि. किंवा नोव्हॅल्युरॉन १ मि.लि. किंवा डायमिथोएट १.५ मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास वरीलपैकी कीटकनाशक बदलून पुढील फवारणी १५ दिवसांच्या अंतराने घ्यावी.
👉या महिन्यामध्ये मृग बहराच्या फळांवर कोळी कीडीचा प्रादुर्भाव दिसतो. कोळी प्रादुर्भावामुळे हिरव्या फळांवर तांबूस रंगाचे चट्टे दिसतात. पुढे हळूहळू ते काळ्या रंगाचे होतात. कोळी नियंत्रणाकरिता, डायकोफॉल १.५ मि.लि. किंवा इथिऑन २ मि.लि. किंवा विद्राव्य गंधक ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने घ्यावी.
👉काळी माशी आणि पांढरी माशी या रसशोषक कीडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) ०.५ मि.लि. किंवा अॅसीफेट (७५ डब्लूपी) १.२५ ग्रॅम किंवा डायमिथोएट (३० ईसी) २ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी पानाच्या खालच्या बाजूस संपूर्ण झाड कव्हर होईल या पद्धतीने ५० टक्के अंडी फुटल्यानंतर करावी. मोठा घेर असलेल्या झाडांना ५ ते ७ लिटर द्रावणाची आवश्यकता असते. फवारणी कोरड्या वातावरणात करावी. पुढील फवारणी १५ दिवसांच्या अंतराने कीटकनाशक बदलून करावी. काळ्या माशीच्या प्रादुर्भावामुळे पानांवर सुटी मोल्ड या बुरशीची वाढ दिसून येते. ही बुरशी संपूर्ण पानांवर पसरते. या बुरशीच्या नियंत्रणासाठी स्टार्च द्रावण २ टक्के फवारणी करावी. या फवारणीनंतर कॉपर ऑॅक्सिक्लोराइड ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post