संत्रा-मोसंबी-लिंबू
🍊 मृग बहर व्यवस्थापन
👉मृग बहर धरलेल्या संत्रा व मोसंबी झाडांसाठी ठिंबक सिंचन पद्धतीने सिंचन करावे. या काळात ६ वर्षांच्या झाडाला प्रतिदिन ४१ लिटर, ८ वर्षांच्या झाडाला ६५ लिटर आणि १० वर्षांच्या झाडाला ८२ लिटर पाणी द्यावे. लिंबू झाडांसाठी ६ वर्षे वयाच्या झाडाला प्रतिदिन २३ लिटर, १० वर्षांच्या झाडाला ७५ लिटर पाणी द्यावे.
👉मृग बहराच्या फळांचा आकार वाढविण्याकरिता, जिबरेलिक अॅसिड १ ग्रॅम अधिक मोनो पोटॅशिअम फॉस्फेट (१२-६१-०) किंवा पोटॅशिअम नायट्रेट (१३-०-४५) यापैकी एक १.५ किलो प्रति १०० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. पंधरा ते वीस दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.