पूर्वहंगामी ऊस हिरवळीचे खत व्यवस्थापन

 पूर्वहंगामी ऊस

पूर्वहंगामी उसाचा कालावधी १५ महिने व त्यानंतर एक किंवा त्यापेक्षा जास्त खोडवे घेतले जात असल्यामुळे उसासाठी मध्यम ते भारी मगदुराची व उत्तम निचऱ्याची जमीन असावी. जमिनीची खोली ६० ते १२० सें.मी. असावी. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण किमान ०.५ टक्‍के असावे. भारी जमिनीतील १ ते २ फूट खोल जमिनीचा कठीण थर फोडण्यासाठी दर तीन वर्षांतून एकदा सब सॉयलरचा वापर करावा. एक टन ऊस उत्पादनासाठी १.२५ ते १.५० किलो नत्र, ०.६० ते ०.७५ किलो स्फुरद आणि १.५० ते २.०० किलो पालाश जमिनीतून शोषून घेतले जाते. त्यामुळे माती परिक्षण करून शास्त्रीय पद्धतीने सेंद्रिय, रासायनिक आणि जिवाणू खतांचा एकत्रित वापर करून एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे. सेंद्रिय खतांच्या वापरामुळे जमिनीच्या जैविक आणि भौतिक सुपिकतेमध्ये वाढ होते. सेंद्रिय खतांच्या वापरामुळे जमिनीत हवा खेळती राहते, जिवाणूंची संख्या आणि सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. यामुळे अन्नद्रव्ये उपलब्ध होण्याचे प्रमाण देखील वाढते. रासायनिक खताबरोबर सेंद्रिय खतांपैकी जे उपलब्ध असेल ते वापरावे. लागवडीपूर्वी किंवा लागवडीच्या वेळेस सेंद्रिय खत वापरावे. कारण सेंद्रिय खताद्धारे अन्नद्रव्यांची उपलब्धता ही सावकाश होते.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post