हरभरा पिक आठवडी सल्ला सुधारित वाणांची निवड

वाणांची निवड

हरभर्‍याचे विजय, विशाल, दिग्विजय, जाकी ९२१८ हे प्रचलित व लोकप्रिय वाण असून नव्याने प्रसारित वाण देखील अधिक उत्पादनक्षम आहेत.

सुधारीत वाण

हरभरा पिक आठवडी सल्ला सुधारित वाणांची निवड

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🌱  देशी

वाण : कालावधी (दिवस) : उत्पादन (क्विं/हे) : वैशिष्टये

👉🏽 फुले विक्रम : जिरायत ९५-१००, बागायत १०५-११० : जिरायत १६, बागायत २२, उशिरा पेरणी २१ : वाढीचा कल उंच असल्यामुळे यांत्रिक काढणीस उपयुक्त, अधिक उत्पादनक्षमता, मररोग प्रतिकारक, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य

👉🏽 फुले विक्रांत : १०५-११० : बागायत २० : मध्यम दाणे, मररोग प्रतिकारक्षम, बागायत पेरणीस योग्य

👉🏽 फुले विश्वराज : ९५-१०५ : जिरायत १५-१६ : पिवळसर टपोरे दाणे, मररोग प्रतिकारक्षम, जिरायत पेरणीस योग्य

👉🏽 आरजीव्ही २०२ : १०५-११० : बागायत २० : उशिरा पेरणीकरिता योग्य, मररोग प्रतिकारक्षम

👉🏽 पीडीकेव्ही कांचन : १०५-११० : बागायत १८-२० : पिवळसर तांबूस, टपोरे दाणे, मररोग प्रतिकारक, जिरायत तसेच बागायत पेरणीस योग्य

👉🏽 पीडीकेव्ही कनक : १०८-११० : बागायत १८-२० : यांत्रिक पद्धतीने काढणीस उपयुक्त, मध्यम टपोरे दाणे, मररोग सहनशील, संरक्षित ओलिताखाली पेरणीसाठी शिफारस

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🌱 काबुली

👉🏽 कृपा : १०५-११० : बागायत १८ : जास्त टपोरे दाणे असणारा काबुली वाण, दाणे सफेद पांढर्‍या रंगाचे, सर्वाधिक बाजारभाव

👉🏽 पीकेव्ही-२ : ११०-११५ : बागायत १६-१८ : अधिक टपोरे दाणे, अधिक बाजारभाव, मररोग प्रतिकारक्षम

👉🏽 पीकेव्ही-४ : १०५-११० : बागायत १२-१५ : अधिक टपोरे दाणे, अधिक बाजारभाव, मररोग प्रतिकारक्षम

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

अधिक माहितीसाठी आठवडी पिक सल्ला,कृषी वार्ता साठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post