पशु संवर्धन सल्ला |बाह्यपरजीवींच्या नियंत्रणासाठी उपाययोजना|

 बाह्यपरजीवींच्या नियंत्रणासाठी उपाययोजना 

👉 बाह्यपरजीवींच्या नियंत्रणासाठी बाजारात गोचिडनाशके उपलब्ध आहेत. त्यामध्ये गोचीड, पिसवा आणि उवांच्या नियंत्रणासाठी अंगावर फवारणी, पाठीवर सरळ रेषेत ओतण्यासाठी किंवा इंजेक्शनद्वारे देण्यासाठी उवा, गोचिडनाशकांचा वापर होतो. ही सर्व औषधे विषारी असल्याने, पशुपालकांनी पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसारच वापर करावा. 

👉 माशांच्या नियंत्रणासाठी गोठ्यामध्ये स्वच्छता राखावी. शेणखताचा खड्डा गोठ्यापासून लांब असावा. 

👉 शेणाच्या गोवऱ्यांमध्ये कडुनिंबाचा पाला टाकून त्याचा धूर करावा. ज्यामुळे गोठ्यातील माश्या दूर जातात. 

👉 सर्व बाह्यपरजीवींकरिता वनौषधी म्हणून नीमतेल १५ मि.लि., करंज तेल १५ मि.लि. आणि अंगाच्या साबणाचा चुरा १० ग्रॅम या घटकांचे एक लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करून ते जनावरांच्या अंगावर फवारावे. फक्त जनावरांना ते चाटू न देता अंगावर सुकू द्यावे. या द्रावणामुळे बाह्यपरजीवींचे नियंत्रण करता येते. 

👉 गोचिडांची अंडी आणि अर्भकावस्था या भिंतीवरील कडेकपारीत, दावणीमध्ये, भिंतींना पडलेल्या चिरांमध्ये असतात. त्यामुळे जनावरे गोठ्याबाहेर काढून फटींमध्ये लपलेल्या गोचिडांच्या अर्भकावस्थांना मशालीच्या साहाय्याने जाळून टाकावे. त्यानंतर भिंतींच्या चिरा डांबराच्या अथवा चुन्याच्या लेपाने बुजवून टाकाव्यात. जेणेकरून गोचिडांना अंडी देण्यासाठी सोयीस्कर जागा उपलब्ध राहणार नाही. अशा ठिकाणी शिफारशीत गोचिडनाशक फवारावे. हे द्रावण जनावरे चाटणार नाहीत याची दक्षता घ्यावी. 

👉 खरजेचे किटाणू अतिशय सूक्ष्म आणि त्वचेच्या आत खोलवर असतात. तसेच ते एका वेळच्या उपचाराला प्रतिसाद देत नाहीत. खरजेच्या किटाणूंच्या नियंत्रणासाठी बाजारात खरूजनाशक, मलम उपलब्ध आहेत. ही औषधेसुद्धा विषारी असून ती पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसारच वापरावीत.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post