सोयाबीन पिक फुलोरा ते शेंगा धरण्याच्या अवस्थेतील व्यवस्थापन

सोयाबीन 

सोयाबीन पिक सध्या फुलोरा ते शेंगा धरण्याच्या अवस्थेत असल्याने पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास संरक्षित पाणी द्यावे. सोयाबीन पिकात पिवळा मोझॅक दिसून येत असल्यास प्रादूर्भावग्रस्त झाडे तात्काळ उपटून नष्ट


करावीत. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिकामध्ये एकरी १५-२० पिवळे चिकट सापळे लावावेत. सोयाबीन पिकावरील पिवळा मोझॅक प्रसारासाठी कारणीभूत असलेल्या पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी बीटा सायफ्लुथ्रिन (८.४९%) + इमिडाक्लोप्रीड (१९.८१% ओडी) ०.७ मि.लि. किंवा थायमिथोक्झाम (१२.५%) + लॅमडा सायहॅलोथ्रीन (९.५% झेडसी) ०.२५ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिकावरील स्पोडोप्टेरा, उंटअळी, केसाळअळी, घाटेअळी या पाने खाणाऱ्या अळ्यांच्या व्यवस्थापनासाठी फ्लुबेंडामाईड (३९.३५ एससी) ०.३ मि.लि. किंवा क्लोरअॅन्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.३ मि.लि. किंवा इमामेक्टीन बेन्झोएट (५ एसजी) ०.४४ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिकावरील शेंगावरील करपा रोगाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून फुलोरा अवस्थेतील सोयाबीन पिकावर टेब्युकोनॅझोल (१०%) + सल्फर (२५% डब्ल्यूजी) २.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप बघून फवारणी करावी.




Post a Comment (0)
Previous Post Next Post