केळी पिक आठवडी सल्ला फुलकिडी (थ्रीप्स) व्यवस्थापन

 केळी
फुलकिडी (थ्रीप्स) 

घड निसवल्यावर व सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत प्रादुर्भाव दिसून येतो. कीड घडातील अपरिपक्व फळांची साल खरवडून त्यातून बाहेर येणारा अन्नरस शोषण करते. प्रादुर्भावग्रस्त फळांच्या सालीवरील पेशी मरतात. त्यामुळे फळांवर तांबूस तपकिरी किंवा लालसर रंगाचे चट्टे पडतात. फळे लालसर दिसू लागतात. फळांची साल लालसर झाली तरी त्याचा फळातील गरावर अनिष्ट परिणाम दिसून येत नाही. परंतु, फळे पक्व झाल्यावर लालसरपणा वाढतो. जास्त प्रादुर्भाव झालेल्या फळांवर बारीक तडे पडलेले दिसतात. यामुळे फळांची गुणवत्ता खालावते. योग्य बाजारभाव मिळत नाही. 

🛡️ व्यवस्थापन

👉 बागेची स्वच्छता ठेवावी. बागेतील तण मुळासहित उपटून काढावे. 

👉 कापलेल्या झाडाचे अवशेष व मोडलेली केळफुले गोळा करून बागेबाहेर लांब टाकावीत. 

👉 परादुर्भावग्रस्त बागेतील कंद लागवडीसाठी वापरू नयेत. वापरायचे असल्यास लागवडीपूर्वी कंदप्रक्रिया जरूर करावी. 

👉 कळफुल निसवताच २-६ टक्के सच्छिद्रता असलेली प्लॅस्टिक किंवा पॉलीप्रोपॅलीनच्या पिशवीने घड पूर्णपणे झाकावेत. 

👉 जैविक नियंत्रण- व्हर्टीसिलीयम लेकॅनी २ ग्रॅम किंवा अॅझाडिरेक्टीन (१५०० पीपीएम) ५ मि.लि. अधिक स्टिकर १ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे शेवटचे पान निघाल्यावर किंवा केळफूल बाहेर पडतेवेळी पहिली आणि संपूर्ण घड निसवल्यावर दुसरी फवारणी करावी. 

फुलकिडीची कोषावस्था जमिनीत राहत असल्यामुळे,  जमिनीवर बिव्हेरिया बॅसियाना ५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी प्रमाणे फवारावे.
👉 रासायनिक नियंत्रण- प्रादुर्भाव जास्त असल्यास, ॲसेटामिप्रीड (२० एसपी) ०.१२५ ग्रॅम अधिक स्टिकर १ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे केळफूल निसवतेवेळी पहिली आणि संपूर्ण घड निसवल्यावर दुसरी फवारणी करावी.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post