कापूस पिकाची वाढीची अवस्था व रसशोषक कीड प्रादुर्भाव स्थितीनुसार एकात्मिक व्यवस्थापन

 कापूस

पिकाची वाढीची अवस्था व रसशोषक कीड प्रादुर्भाव स्थितीनुसार एकात्मिक व्यवस्थापन 

⭕️ पेरणीनंतर ६० ते ९० दिवसांपर्यंत -  

👉 तूडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे, मावा 

✅ तूडतुडे व पांढरी माशीच्या सर्वेक्षणासाठी एकरी १० पिवळे चिकट सापळे व नियंत्रणाकरिता एकरी ४० पिवळे चिकट सापळे लावावेत. 

✅ २५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त झाडांची खालच्या भागातली काही पाने गुंडाळलेली व आकसलेली, झाडाच्या काही पानांच्या कडेला पिवळेपणा असल्यास, फवारणी (प्रति लिटर पाणी)  

- सर्व रसशोषक किडी 

फ्लोनिकामिड (५० डब्ल्यूजी) ०.४ ग्रॅम किंवा डिनोटोफ्युरान (२० एसजी) ०.३ ग्रॅम किंवा थायमेथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) ०.२५ ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रिड (१७.८ एसएल) ०.३ मि.लि. 

- पांढरी माशी 

स्पायरोमिसिफेन (२२.९ ईसी) किंवा पायरोप्रॉक्सिफेन (१० ईसी) २ मि.लि. 

- फुलकिडे 

स्पिनेटोरम (११.७ एससी) ०.८ मि.लि.  

👉पिठ्या ढेकूण 

✅ शेतातील गाजर गवताचा नायनाट करावा. प्रादुर्भावग्रस्त झाडे प्लॅस्टिकच्या पिशवीत जमा करून नष्ट करावीत, तसेच घातक रसायनांचा वापर टाळून ॲनासियस बंबावली व अॅसिरोफॅगस पपई या परोपजीवी मित्रकीटकांचे संवर्धन करावे.  

✅ एकरी २० किंवा त्यापेक्षा जास्त झाडांची एक फांदी पिठ्या ढेकणाने पूर्णपणे आच्छादलेली आढळल्यास, ॲसिफेट (७५ एसपी) १ ग्रॅम प्रति लिटर पाणी हे द्रावण झाडाच्या खोडावर व जमिनीवर टाकावे.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post