सोयाबीन पिक आठवडी सल्ला

 सोयाबीन 

सोयाबीन पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत खोडमाशीचा प्रादुर्भाव बहुतांश ठिकाणी आढळून आला होता. प्रादुर्भावग्रस्त सोयाबीन पिकासाठी ज्या शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना केल्या, त्यांच्या शेतात प्रादुर्भाव कमी होऊन शेंगांचे प्रमाण चांगले राहिले. मात्र जे शेतकरी वेळेवर उपाययोजना करू शकले नाहीत, त्यांच्या शेतात सोयाबीन पीक जास्त प्रादुर्भावग्रस्त झाले. अशा ठिकाणी शेतात पाने पिवळी पडून झाडे सुकण्यास सुरुवात झालेली असेल. अशा परिस्थितीत खोडमाशी, चक्री भुंगा सोबतच पाने खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी थायमेथोक्झाम (१२.६%) + लॅमडा साह्यलोथ्रीन (९.५% झेडसी) ०.२५ मि.लि. किंवा क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.३ मि.लि. किंवा इंडोक्झाकार्ब (१५.८ ईसी) ०.७ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. 

अधिक पावसामुळे ज्या शेतात पाणी साचलेले असेल, ते प्रथम बाहेर काढण्याची व्यवस्था करावी. अतिरिक्त ओलाव्याच्या स्थितीत सोयाबीनच्या मुळांना जमिनीतील पोषणद्रव्ये शोषण्यात अडथळे येतात. या सोबतच सततच्या ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाश अपुरा पडल्यास पिकाच्या प्रकाश संश्लेषण क्रियेवर त्याचा विपरीत परिणाम होऊन सोयाबीनची पाने पिवळी पडतात. अशा पानांच्या शिरा मात्र हिरव्या राहतात. अशा परिस्थितीमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता लक्षात घेता, विशेषतः नत्र व पालाश यांचा पुरवठा करण्यासाठी पोटॅशिअम नायट्रेट (१३-०-४५) १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post