टोमॅटो पिक आठवडी सल्ला ब्लॉसम एंड रॉट नियोजन

 टोमॅटो

ब्लॉसम एंड रॉट 

टोमॅटो पिकामध्ये कॅल्शिअम या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे शेंड्याची वाढ खुंटून शेंडा ठिसूळ व अशक्त होतो. फळांचे देठ कमकुवत होऊन फळगळ वाढते. फळांच्या खालच्या बाजूस काळसर भाग (ब्लॉसम एंड रॉट) तयार होऊन थोड्या दिवसांनी ही फळे कुजून गळून पडतात. फळ नासणे, फळ बारीक होऊन सुकल्यासारखे होणे, फळे तडकणे, टिकवण क्षमता कमी होणे अशा समस्या दिसून येतात. कॅल्शिअम कमतरतेमुळे फळे तडकण्याचे प्रमाण वाढते. 

👉माती परीक्षणानुसार कॅल्शिअमची कमतरता असल्यास पिकाच्या सुरुवातीच्या काळापासून कॅल्शिअमयुक्त खते वापरावीत. 

👉जमिनीमधून कॅल्शिअम नायट्रेट, सिंगल सुपर फॉस्फेट तसेच जिप्समद्वारेसुद्धा कॅल्शिअमचा पुरवठा केला जाऊ शकतो. 

👉टोमॅटो पुनर्लागवडीनंतर रोपावस्था, फुलधारणा, फळधारणा या अवस्थेत चिलेटेड कॅल्शिअम ०.५ ते १ ग्रॅम किंवा कॅल्शिअम क्लोराईड २ ते २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.




Post a Comment (0)
Previous Post Next Post