वेल वर्गीय पिके कीड नियंत्रण | फळमाशी व्यवस्थापन |

 वेल वर्गीय पिके
कीड नियंत्रण 


⭕️ फळमाशी - फळमाशी ही फळांच्या वरील पापुद्र्यात अंडी घालते. त्यातून बाहेर पडलेल्या अळ्या फळात राहून गर खातात. त्यामुळे फळे सडतात, वेडीवाकडी होतात आणि अकाली पक्व होतात. 

🛡️ व्यवस्थापन

👉 फळांची काढणी योग्य पक्वतेस करावी. 

👉 परादुर्भावग्रस्त फळांमधून फळमाशीची उत्पत्ती वाढत असल्याने अशी फळे गोळा करून नष्ट करावीत. 

👉 फळमाशीची कोषावस्था मातीत २ ते ३ सें.मी. खोलीपर्यंत आढळते. त्यामुळे वेलांखालील माती वेळोवेळी हलवून घ्यावी, जेणेकरून कोष उघडे पडून सूर्यकिरणे व पक्षांद्वारे त्यांचे नियंत्रण होईल. 

👉 कयू ल्युरचे एकरी ५ कामगंध सापळे लावावेत. 

👉 फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, नियंत्रणासाठी मॅलॅथिऑन (५० ईसी) २ मि.लि. अधिक गूळ १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या विषारी अमिषाची फवारणी करावी.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post