आडसाली ऊस पाणी व्यवस्थापन आणि ठिबक सिंचन

 आडसाली ऊस

💧 पाणी व्यवस्थापन आणि ठिबक सिंचन 

आडसाली उसासाठी एकरी १३० ते १४० लाख लिटर पाण्याची गरज असते. साधारणपणे ३८ ते ४० पाण्याच्या पाळया लागतात. दोन पावसाळयांमुळे ८ ते १० पाणी कमी लागतात. ठिबक सिंचन पद्धतीमुळे ५० टक्क्यांपर्यंत पाण्याची बचत, खतांमध्ये २५ टक्के बचत आणि उत्पादनात २० टक्के वाढ होते. मातीची भौतिक तपासणी करुन ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करावा. ठिबक सिंचनाचे पाणी सरीच्या दोन्ही बाजूंना पोहचत असल्याची ओलावा तपासून खात्री करावी. 

🎋 विद्राव्य खतांचा वापर 

ठिबक सिंचनातून खते दिल्यास कार्यक्षमता ९० टक्क्यांपर्यंत वाढते, तर प्रचलित पद्धतीत ३५ ते ४० टक्के खते उपयोगी पडतात. लागणीपासून मोठ्या बांधणीपर्यंत दर आठवड्याच्या अंतराने समान २० हप्त्यांत किंवा दर पंधरा दिवसांच्या अंतराने समान १० हप्त्यांत नत्र खताची मात्रा विभागून दिल्यास उसाच्या उत्पादनात भरीव वाढ होते. नत्रासाठी युरिया, स्फुरदयुक्त खते देण्यासाठी फॉस्फरिक अॅसिड किंवा १२:६१:०० या खतांचा वापर करावा. पालाश खतांच्या वापरासाठी पांढरे पोटॅशिअम क्लोराइड वापरावे. पाण्यात विरघळणाऱ्या मिश्र खतांत १९:१९:१९, २०:२०:२०, २०:०९:२०, १५:०४:१५ तर द्रवरूप खतांत ४:२:८, ६:३:६, ६:४:१०, १२:२:६, ९:१:६ अशी विविध ग्रेडची खते उपलब्ध आहेत. ही खते प्रमाणबद्ध व शिफारशीप्रमाणे वापरावीत.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post