तूर पिकातील रोग नियंत्रण

 तूर

रोग नियंत्रण 

⭕️ मर 

सुरुवातीला झाडांची शेंड्याकडील पाने कोमेजतात, कालांतराने पाने पिवळी पडून जमिनीकडे झुकतात. काही झाडांवर जमिनीपासून खोडांपर्यंत तपकिरी पट्टा दिसून येतो. पीक दोन महिन्याचे असताना पाने व फांद्या सुकू लागतात. थोड्याच दिवसांत संपूर्ण झाड वाळते. फांद्या शेंड्याकडून खाली वाळतात. खोडाचा उभा छेद घेतल्यास त्याचा मधला भाग संपूर्ण तपकिरी, काळा पडल्याचे आढळून येते. रोगाचा प्रसार रोगग्रस्त बियाणे व जमिनीतील बुरशीच्या बिजाणूपासून होतो.  

🛡️ नियंत्रण 

👉जमिनीची उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट करावी. रोगकारक बुरशी नष्ट होण्यासाठी जमीन चांगली तापू द्यावी. 

👉मर रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या शेतामध्ये पाच-सहा वर्षांपर्यंत तुरीची लागवड करू नये. 

⭕️ खोडकुजव्या 

पाने सुकून वरच्या दिशेने वळतात, जलदगतीने वाळतात, झाडांची मर अतिशय वेगाने होते. प्रादुर्भाव रोपावस्थेत झाल्यास सर्व रोपे एकदम मरून जातात. जमिनीपासून १०-२० सें.मी. उंचीवरील खोडावर गर्द तपकिरी खोलगट लांब चट्टे दिसतात. सुरुवातीला उथळ आणि कालांतराने ते आत दबले जाऊन खोलवर जातात. फांद्यावर चट्टे दिसतात. चट्ट्यांचा आकार वाढत जाऊन झाडाच्या मुख्य बुंध्याला वेढतात. झाड कमकुवत होऊन त्याठिकाणी लगेच तुटते. खोडाच्या चट्ट्यांचा उभा छेद घेतल्यास आतील भाग तपकिरी काळा पडल्याचे दिसून येते. 

🛡️  नियंत्रण 

👉 मागील हंगामातील धसकटे वेचून त्यांची विल्हेवाट लावावी. 

👉 शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. 

👉 उथळ, पाणथळ जमिनीमध्ये तुरीचे पीक घेऊ नये. 

👉 पेरणीपूर्वी थायरम ३ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास प्रक्रिया करावी. 

👉 कार्बेन्डाझीम (५० डब्ल्यूपी) १ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post