तूर
आंतरपीक आणि मिश्रपीक पद्धती
पारंपारिक शेतीमध्ये कोरडवाहू क्षेत्रात तूर मिश्र किंवा आंतरपीक म्हणून घेतली जाते.
👉 कपाशीच्या ६ किंवा ८ ओळींनंतर एक ओळ तूरीची अशी पध्दत विदर्भामध्ये प्रचलीत आहे. यासाठी ५-६ महिने कालावधी असलेल्या जातींची निवड करावी.
👉 पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग तसेच मराठवाडा, विदर्भामध्ये खरीप ज्वारीच्या क्षेत्रामध्ये ४५ सें.मी. अंतरावर ज्वारीच्या दोन ओळी, त्यानंतर ३० सें.मी. अंतरावर तूरीची एक ओळ अशी पध्दत प्रचलीत आहे. यासाठी वरीलप्रमाणे ५-६ महिने कालावधीच्या जाती चांगले उत्पादन देतात.
👉 पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये बाजरीमध्ये तूरीचे आंतरपीक घेण्याची पद्धत आहे. यासाठी ४५ सें.मी. अंतरावर बाजरीच्या दोन ओळी आणि एक ओळ तुरीची या पध्दतीने पेरणी केल्यास बाजरीचे पीक सप्टेंबरपर्यंत निघून जाते आणि पुढे पडणार्या हस्ताच्या पावसावर तूरीचे पीक हाती येते.
👉 भुईमूग, सोयाबीनच्या तीन ओळींनंतर तुरीची एक ओळ पेरावी. दोन ओळींतील अंतर ३० सें.मी. ठेवावे.
👉 मुग, उडीद, चवळी यांसारख्या कमी कालावधीच्या पिकांच्या दोन ओळी आणि एक ओळ तुरीची याप्रमाणे आंतरपीक घेतल्यास तुरीच्या जोमदार वाढीची सुरुवात होण्यापूर्वी हे पीक हाती येते. पुढील काळामध्ये तूर वाढीस लागते. अशावेळी मूग, उडीद, चवळी काढून झालेल्या जागेत डवरणी करुन ज्वारीची एखादी ओळ पेरल्यास सप्टेंबर-ऑक्टोबरच्या पावसाचा त्यांना लाभ होतो. डिसेंबरपर्यंत तुरीचे पीक हाती येते, पुढे जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत ज्वारी काढणीस येते. या सर्व प्रकारामध्ये शेतकर्यांना घरच्यापुरती ज्वारी, जनावरांना कडबा, बोनस पीक व मुख्य पीक तूर होते.