कापूस
आंतरपीक पद्धती
निखळ कपाशी पीक घेण्याऐवजी आंतरपिके घ्यावीत. त्यातून निव्वळ आर्थिक उत्पन्न निखळ कपाशीपेक्षा अधिक मिळते. कपाशीच्या ६ ओळीनंतर तुरीची १ ओळ किंवा कपाशीच्या ८ ओळीनंतर तुरीच्या २ ओळी घेणे ही आंतरपीक पद्धती राज्यात राबवली जाते. उडीद व सोयाबीन ही आंतरपिके १:१ प्रमाणात (कापसाच्या एका ओळीनंतर आंतरपिकाची एक ओळ) घेतल्यास फायदेशीर ठरते. कोरडवाहू लागवडीमध्ये १२० x ४५ सें.मी. अंतरावरील लागवडीमध्ये मूग या आंतरपिकाची लागवड १:२ प्रमाणात करावी. मुगाच्या आंतरपीक लागवडीसाठी एकरी २.५-३ किलो बियाणे लागते.