केळी पिक आठवडी सल्ला

 केळी

वातावरण ढगाळ, दमट असल्याने केळीवर करपा, पोंगा कुज (इर्विनिया रॉट) रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. 

करपा रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बागेत कुठेही पाणी साचू देऊ नये. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून १ ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा २.५ ग्रॅम मॅंकोझेब अधिक १ मि.लि. स्टिकर प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

पोंगा कुज (इर्विनिया रॉट) या जिवाणूजन्य रोगामध्ये केळीचा पोंगा कुजतो, तसेच जमिनीलगत बुंधा कुजतो. या रोगाची लक्षणे दिसताच १०० लिटर पाण्यात ३०० ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड, १५ ग्रॅम स्ट्रेप्टोसायक्लीन, ३०० मि.लि. क्लोरपायरीफॉस मिसळून या द्रावणाची २०० मि.लि. प्रति झाड आळवणी (ड्रेचिंग) करावी.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post